Class 11 Marathi Yuvakbharati -Natak- 1- Hasva Fasvi / हसवाफसवी

विषय : मराठी नाटक -साहित्यप्रकार - परिचय : भाग -३ , 

१  हसवाफसवी



दिलीप प्रभावळकर (१९४४) :

मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते, लेखक. 'झपाटलेला', 'चौकट राजा', 'एक डाव भुताचा' या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय. 'अवतीभवती', 'कागदी बाण', 'गुगली', 'चूकभूल दयावी घ्यावी', 'बोक्या सातबंडे' (भाग १ ते ३), 'हसवाफसवी' हे लेखन प्रसिद्ध. 'बोक्या सातबंडे' या पुस्तक मालिकेसाठी 'बालसाहित्य पुरस्कार', संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

'हसवाफसवी' ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा, निखळ आणि निर्भळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक वाचताना, त्याचा नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक हसतात व गंभीर आणि अंतर्मुखही होतात. ळचे गायक-नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. ते आपल्या कोकणातल्या गावाहून सपत्नीक येणार आहेत-यायला निघाले आहेत-येत आहेत-आले आहेत, असा टप्प्याटप्प्याने हा प्रवास आहे. या कार्यक्रमाचे धांदरट संयोजक वाघमारे, त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका, चिमणराव, प्रिन्स, नाना आणि दीप्ती अशी पात्ररचना मूळ नाटकात आहे. अफलातून कल्पना, विसंगती, संवाद व शाब्दिक कोट्या यांमुळे नाटकातील प्रसंग रंगतदार झाले आहेत. या नाटकाच्या प्रयोगांना नाट्यरसिकांची दाद मिळाली आहे. 

स्वाध्याय 


(१) (अ) कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा :
उत्तर:
कृष्णराव अंबुडी गावाहून निघाले.
कुंदनपूरला टांग्याने आले.
तिथून एस. टी, ने पुण्याला आले.
पुण्याहून कर्जतपर्यंत आले.
तिथून ठाणे मार्गे मुंबईला आले.

 (आ) करणे लिहा

(१) फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात 
कारण – मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यामुळे ते प्रखर उजेडाकडे बघू शकत नाहीत.

(२) कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले;
कारण चाहत्याची डॉज गाडी पंक्चर होऊन वाटेत बंद पडली.

(२) थोडक्यात वर्णन करा.

(१) कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप : कृष्णराव हे जन्या पिढीतील बाल गोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ गायक नट आहेत. त्यांच्या या कलासेवेबद्दल कृतज्ञता म्हणून सरकारतर्फे त्यांचा सत्कार आहे. त्यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

(२) कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास : सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सत्कारासाठी कृष्णराव हे त्यांच्या अंबुडी गावाहून निघाले. ते टांग्याने कुंदनपूरला आले. तिथून ते एस.टी. ने पुण्याला आले.पुण्याहून ट्रेननी मुंबई ला यायला निघाले. ट्रेनमध्ये त्यांना एक त्यांचा चाहता भेटला. त्याने कृष्णरावांच्या पायाशी लोटांगण घातले व त्यांनी कर्जतच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला. चाहत्याचे मन मोडू नये, म्हणून कृष्णराव कर्जतला उतरले.

(३) थोडक्यात लिहा.

(१) मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग :
उत्तर: (१) कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप : कृष्णराव हे जन्या पिढीतील बाल गोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ गायक नट आहेत. त्यांच्या या कलासेवेबद्दल कृतज्ञता म्हणून सरकारतर्फे त्यांचा सत्कार आहे. त्यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

(२) कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास : सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सत्कारासाठी कृष्णराव हे त्यांच्या अंबुडी गावाहून निघाले. ते टांग्याने कुंदनपूरला आले. तिथून ते एस.टी. ने पुण्याला आले.पुण्याहून ट्रेननी मुंबई ला यायला निघाले. ट्रेनमध्ये त्यांना एक त्यांचा चाहता भेटला. त्याने कृष्णरावांच्या पायाशी लोटांगण घातले व त्यांनी कर्जतच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला. चाहत्याचे मन मोडू नये, म्हणून कृष्णराव कर्जतला उतरले.

(२) कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती :
उत्तर: कृष्णराव ट्रेनने पुण्याहून मुंबईला सत्कारासाठी निघाले होते, ट्रेनमध्ये त्यांचा एक चाहता 'भेटला, त्याने कृष्णरावांची नाटके वडिलांच्या, आईच्या, कधी स्वयंपाकीण काकूंच्या, तर कधी मानलेल्या मावशीच्या मांडीवर बसून पाहिली होती. या चाहत्याला कृष्णरावांची ओळख पटताच तो त्यांच्या पाया पडला. त्याला इतका हर्षवायू झाला की भर गर्दीच्या ट्रेनमध्ये त्याने कृष्णरावांच्या पायाशी लोटागंण घातले व कृष्णरावांना कर्जतला घरी येण्याचा प्रचंड आग्रह करू लागला. चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती इतकी होती की माझ्या घरात पायधूळ झाडल्याशिवाय तुमचे पाय सोडणार नाही, असे विनवू लागला. तो चाहता म्हणजे प्रेमाच्या जबरदस्तीचा एक नमुना होता.


(४) स्वमत

(१) प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तर : कृष्णराव हेरंबकर हे बाळ गोविंद नाटक मंडळीतले जुन्या जमान्यातील ज्येष्ठ गायक-नट होते. त्यांचे मूळ नाव विठू होते. त्यांनी गडकरी, खाडिलकर, देवल यांच्या नाटकांतील भूमिका पाठवल्या. सौभद्र या संगीत नाटकातील त्यांची कृष्णाची भूमिका फार गाजली. ती पाहून गोपाळ गणेश आगरकरांनी त्यांना 'कृष्णराव' हे नाव बहाल केले व 'सुधारक' या त्यांच्या दैनिकात कृष्णरावांवर अग्रलेख लिहिला. तेव्हापासून 'कृष्णराव' नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या कलासेवेबद्दल सरकारतर्फे त्यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार होता. या सत्काराला येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. अंबुडीवरून कुंदनपूर, तेथून पुणे व पुण्याहून मुंबई ही दगदग त्यांनी मोठ्या उत्साहाने सोसली. ते इतके हुरळून गेले होते की, प्रसंगी कोंबड्यांच्या गाडीतूनही मुंबईत आले. ते मिश्किल स्वभावाचे, वयपरत्वे चाचरत बोलणारे. कृष्णराव हे अतिउत्साही व धांदरट होते. चाहत्याने लोटांगण घालताच ते चाहत्याचा आग्रह मोडू शकले नाहीत. चाहत्याच्या प्रेमाचे ते भुकेले होते आणि रसिकांनी आग्रह करताच आढेवेढे न घेता त्यांनी सौभद्र मधील 'प्रिये पहा..' हे पद थरथरत्या आवाजात गाऊन दाखवले. कलाकाराचा खरा उत्साह त्यांनी वृद्धापकाळातही टिकवला होता.

(२) 'कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो', तुमचे मत लिहा.
उत्तर : आपण जेव्हा नाट्यउतारा वाचतो, तेव्हा केवळ संवादांतून रंगमंचावरील पात्रांच्या हालचाली, हावभाव कळतीलच असे नाही. रंगभूमी वरील नाट्य डोळ्यांसमोर उभे राहावे म्हणून कंसांतील मजकूर उपयुक्त ठरतो. उदा., मोनिका (घाईघाईत येऊन उभी राहते.) यावरून तिच्या हालचाली आपणांस कळतात. कृष्णराव फोटोच्या फ्लॅशलाइट ने अचानक दचकतात व संजय या फोटोग्राफरवर चिडतात हे कंसातील मजकुरानेच डोळ्यांसमोर येते. शाल पांघरण्यातला घोळ कळतो. कृष्णराव हातात श्रीफळ घेऊन कानाशी हलवून पाहतात, तेव्हा त्यांचा व्यवहारीपणा आपल्या लक्षात येतो. अशा प्रकारे नाटककाराने कंसांत लिहिलेला मजकूर अप्रकट असा अभिनयच असतो, जो वाचकाला नाटकातील रस पूर्ण आस्वादण्यास मदत करतो.
(३) प्रस्तुत नाट्यउताऱ्यामधील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोदनिर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : 'हसवाफसवी' या दिलीप प्रभावळकर यांच्या संपूर्ण नाटकात प्रसंगनिष्ठ विनोद व शाब्दिक विनोद यांची पखरण पाहायला मिळते. प्रस्तुत नाट्यउताऱ्यातही जागोजागी शाब्दिक विनोद अनुभवयास मिळतात.
पहिल्याच प्रसंगात कृष्णराव मोनिकाला 'नाव काय तुझं मुली? असे विचारतात. तेव्हा ती 'मोनिका' असे उत्तर देते. त्यावर 'तर बरं का मनुका-' असे कृष्णराव म्हणतात. ती 'मोनिका' असे म्हणताच, हशा निर्माण होतो. मोनिका व मनुका यांतील शब्दांच्या ध्वनी साधनांमुळे विनोद निर्मिती होते. दुसरे उदाहरण म्हणजे, ट्रेनमध्ये कृष्णरावांना त्यांचा चाहता भेटतो. तो कृष्णरावांचे पाय घट्ट पकडून 'पायधूळ झाडा त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही!' हे वाक्य म्हणताच हशा पिकतो. 'पायधूळ झाडणे' हा वाक्प्रचार व पाय सोडणार नाही, यांतील विरोधाभासामुळे शाब्दिक कोटी साधली आहे.


(५) (अभिव्यक्ती)

(अ) मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : प्रारंभीच मोनिका रसिकांना कृष्णरावांच्या सत्कार विषया। माहिती देते. शाल-श्रीफळ घेताना कृष्णराव शाल पांघरताना घोळ करतात आणि चटकन "थैली देणार होतात व येण्याजाण्याचे भाडे." म्हणजे कृष्णरावांना सरकारी सत्कार नि घरगुती सत्कार यांतील फरक कळत नाही. कृष्णराव संजय या फोटोग्राफरवर चिडतात नि त्यातच आपण अंबुडी गावाहून इथपर्यंत कसे आलो त्याचे पाल्हाळिक व तपशीलवार कथन करतात. मोनिका मध्ये मध्ये त्यांना नाटकाच्या विषयावर बोलण्यासाठी उद्युक्त करीत असते पण कृष्णराव आपल्याच तंद्रीत ट्रेन मध्ये चाहत्याचा घडलेला प्रसंग, त्याची पंक्चर झालेली डॉज गाडी, मग कोंबड्यांच्या गाडीतून केलेला प्रवास, आपली पत्नी पशुपक्ष्यांशी कसे बोलते, यांचे विनोदी व रसाळ वर्णन करतात. शेवटी मोनिका त्यांना नाटकांच्या भूमिकेबद्दल विचारताच कृष्णराव भारावून नाटककारांविषयी व स्वत:च्या भूमिकांविषयी भरभरून बोलतात. पण त्याच वेळी आपण आहार कसा व कोणता घेतो हे मोनिकाच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत गप्पिष्ट स्वभावाचे दर्शन देतात. आणि शेवटी 'प्रिये पहा..' हे पद वयपरत्वे आवाज सांभाळत रसिकाग्रहास्तव म्हणतात.
या संबंध प्रवेशामध्ये मोनिकाची उडालेली तारांबळ व कृष्णराव स्वत:च्याच तंद्रीत सांगत असलेल्या विसंगत कहाण्या याचा तोल सांभाळत नाटककाराने संवादातील खुमारी वाढवत नेली आहे, हीच त्या संवादाची वैशिष्ट्ये ठरतात.

(आ) कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : कृष्णराव हेरंबकर हे जुन्या जमान्यातील गायक-नट स्वत:च्या सत्कारासाठी अंबडडी गावाहन मुंबईला सपत्नीक येतात त्यांची पत्नी बुजऱ्या व शांत स्वभावाच्या आहेत प्रवासातील सगळं दादा सहन करत त्या कृष्णरावांना सांभाळून आणतात. कृष्णराव प्रवासातील पाल्हाळिक वर्णन करत असताना बसल्या जागेवरून त्या कृष्णरावाना लांबून खुणा करून गप्प राहण्याविषयी सांगतात, तेव्हा कृष्णराव त्याची थट्टा करतात व आपल्या पत्नी विषयी अप्रस्तुत पणे अधिक माहिती सांगतात. त्यातून कृष्णरावांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये नाटककारांनी मिश्किलपणे कथन केली आहेत.
ट्रेनमध्ये भेटलेला चाहता जेव्हा कृष्णरावांचे पाय गदागदा हलवू लागला, तेव्हा पत्नीला कृष्णराव खाली पडून कंबरेचे हाड मोडेल ही भीती वाटते. त्यांना आपल्या यजमानांची काळजी वाटते. कोंबड्यांच्या गाडीतून येताना कृष्णरावांची पत्नी खूश झाल्या कारण त्या प्रवासभर कोंबड्यांशी गप्पा मारत होत्या. कृष्णरावांच्या तोंडून पत्नीच्या सवयीविषयी अधिक माहिती कळते की, त्यांच्या पत्नीला पशुपक्ष्यांशी गप्पा मारायला आवडतात.
अशा प्रकारे कृष्णरावांच्या संवादातून एका भाबड्या गृहलक्ष्मीच्या सालस स्वभावाची वैशिष्ट्ये कळतात.

(इ) 'पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही',या वाक्यातील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
उत्तर : कृष्णराव जेव्हा पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत होते, तेव्हा ट्रेनमध्ये त्यांचा एक चाहता भेटला. त्याला जेव्हा कृष्णराव या जुन्याजाणत्या नटवर्याची ओळख पटली, तेव्हा चाहत्याने कृष्णरावांच्या पायावर लोटांगण घातले व कृष्णरावांना घरी येण्याचा आग्रह करू लागला.
प्रस्तुत वाक्य त्या चाहत्याच्या तोंडचे आहे. त्यातील 'पायधूळ' नि 'पाय सोडणार नाही.' या शब्दसमूहांतून शाब्दिक कोटी तर साधलेली आहेच; पण त्यातली गोम अशी आहे की पाय सोडल्या शिवाय कुणीही पायधूळ कसा झाडणार? ही एक मिश्किल लक्ष्यार्थाची पेरणी त्या वाक्यात सहजपणे नाटककाराने केली आहे. 'पायधूळ' व 'पाय' या दोन शब्दांतील मुख्यार्थ बाधित होऊन एक सुंदर 'लक्षणा' येथे साधल्यामुळे, शब्दशक्तीचा हा वेगळा नमुना रसिक प्रेक्षकांना अनभवायास मिळतो